top of page

इंग्रजी शिका फक्त १९९ रुपयांत. किती खरं किती खोटं !


मित्रांनो कोणतीही परदेशी भाषा शिकल्याने तुमची संज्ञानात्मक आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढते. नवीन भाषा शिकणे कठिण असतं हो ना! पण त्यामुळेच आपला मानसिक व्यायाम आणि पर्यायाने विकास होतो.

2012 च्या स्विस अभ्यासातील संशोधनात असं दिसून आलं आहे की नवीन भाषा शिकल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होतो, स्मरणशक्ती, जाणीवपूर्वक विचारांसाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या भागांवर परिणाम होतो आणि भाषा तुम्हाला अधिक सर्जनशील बनवू शकते.


एवढंच नव्हे तर द्विभाषिकता म्हणजेच अनेक भाषा बोलता येत असतील तर हीच गोष्ट मेंदूला वृद्धापकाळापर्यंत मजबूत आणि निरोगी ठेवू शकते. नवीन भाषा शिकल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते.


इंग्रजी भाषा जागतिक भाषा असल्याने वैयक्तिक स्तरावर ती आपलं व्यक्तिमत्त्व सुधारते आणि इंग्रजी अस्खलित म्हणजे अगदी पटापट बोलल्याने तुमची आत्मविश्वासाची भावना वाढते. सोप्या शब्दात, परदेशी भाषा शिकल्याने मेंदू मजबूत आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करणारा बनतो.


आता इंग्रजी भाषा का शिकावी? इंग्रजी भाषेची महती सांगणारे अनेक लेख तुम्हाला आमच्या वेबसाईट वर वाचायला मिळतील. इंग्रजी शिकल्याने आपण जगासोबत खरचं नव्याने जगायला शिकतो. कारण आज जगातील व्यावहारिक भाषा इंग्रजीच आहे. तुमच्या हातातल्या मोबाईलवर असणारं जग इंग्रजीमधूनच जास्त बोलतं बरं का!

आणि त्याच जगासोबत आपल्याला बोलायचं असेल आणि चालायचं असेल तर इंग्रजी यायलाच हवं ना! तुम्हालाही हे पटलं असेलच.


इंग्रजी शिकणारे आणि शिकवणारे सुद्धा अनेक आहेत. आज गल्लोगल्ली इंग्रजी शिका च्या पाट्या लागलेल्या दिसतात. सोशल मिडियावर आपल्याला फक्त १९९ रुपयांत इंग्लिश शिका. अशा जाहिराती दिसतात. आणि मग आम्हाला लोक प्रश्न विचारतात.

EnGrow English Learning कोर्स ची फी एवढी जास्त का आहे?फक्त १९९ रुपयांत इंग्लिश शिकवणाऱ्या कोर्सचे तोटे

मित्रांनो, खऱ्या ज्ञानाची किंमत कुणीही करू शकत नाही. कारण ज्ञान अमूल्य आहे. परंतु कोणत्याही कोर्स ची फी ही त्या कोर्सची किंमत ठरवते. त्याचबरोबर त्या कोर्स चा दर्जाही ठरवते.

इंग्रजी शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी अशी जाहिरात पाहतात. आणि फक्त १९९ रुपयांत आपण इंग्रजी शिकून, अस्खलित इंग्रजीत बोलायला लागू असा विचार करतात.

कोर्स ची कमी फी आणि ‘अस्खलित इंग्रजी बोला’ अशा जाहिरातीला बिचारे विद्यार्थी बळी पडतात. परंतु कोर्स पूर्ण झाल्यावर मात्र आपण नेमकं काय आणि किती इंग्रजी शिकलो ह्याचा हिशोब करता करता निराश होतात. कारण त्यांना असे कोर्स पूर्ण करून इंग्रजी अस्खलित बोलता येत नाहीच. जी त्यांची खरी गरज असते.

अशावेळी आपण का इंग्रजी शिकू शकलो नाही ह्याचं कारणंच अशा छोटे कोर्स करणाऱ्या लोकांना कळत नाही.


इंग्रजी अस्खलित बोलता येण्यासाठी कोणता कोर्स करावा?

मित्रांनो, इंग्रजी भाषा परिपूर्ण शिकायची असेल तर ती तुमच्या वैयक्तिक मेहनतीशिवाय अशक्य आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तुम्ही अस्खलित इंग्रजी शिकण्यासाठी उत्सुक आहात हे आम्हाला माहित आहे. त्याचबरोबर तुमची त्याकरिता मेहनत करण्याची तयारी असेलही. परंतु इंग्रजी शिकवण्याची पद्धत आणि हातोटी ही हाडाच्या अनुभवी शिक्षकाकडेच असते.


१९९ रुपयांत इंग्रजी शिकवणाऱ्या कोर्स मधून किंवा थोडक्यात कोणत्याही व्हिडीओ कोर्स मधून परिपूर्ण इंग्रजी शिकता येत नाही. कारण ह्या पद्धतीत शिक्षकाचा अभाव असतो.

शिक्षक तुमची रोजच्या सरावातून इंग्रजी बोलण्याची, लिहिण्याची, वाचण्याची आणि ऐकण्याची तयारी करून घेतो. कोणतीही भाषा परिपूर्ण शिकण्याची हीच खरी पद्धत आहे.

इंग्रजी बोलण्याची तयारी तेव्हाच होते जेव्हा त्या भाषेत असलेली क्रियापदे(verbs), नवीन शब्द (vocabulary), वाक्यरचना किंवा वाक्य बनवण्याची पद्धत (Sentence construction) आणि महत्वाचं म्हणजे इंग्रजीमधील बारा काळांचं ज्ञान तुम्हाला असायला हवंच. कारण इंग्रजी बोलण्याचा पाया काळांवरच तर अवलंबून आहे.


मित्रांनो, एकंदरीत तुमच्या लक्षात आलंच असेल की, व्याकरणाचा पाया असल्याशिवाय कोणताही विद्यार्थी इंग्रजी शिकूच शकत नाही. व्याकरणाचे नियम शिकताना भरपूर सराव नसेल तर तुम्ही शिकलेलं सर्वच विसरण्याची शक्यता आहे. इंग्रजीच्या कोर्स मध्ये शिक्षकाने

तुम्ही सरावासाठी केलेला अभ्यास तपासून चुकांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. नाहीतर

केवळ व्हिडीओज बघून आपण आपला सरावच पूर्ण करू शकणार नाही. हेच खरं आहे.


तर आता तुम्हाला पटलं असेल, की इंग्रजी शिकण्यासाठी फक्त कामचलाऊ व्हिडीओज कामाचे नाहीत. असा कोर्स केवळ १९९ रुपयांत मिळत असेल तर तुम्ही शोधून अवश्य करा. परंतु सध्या असा कोर्स उपलब्ध असल्याचं माहीत नाही. म्हणूनच अस्खलित इंग्रजी बोलण्यासाठी आधी परिपूर्ण कोर्सची गरज आहे. ज्यामध्ये live लेक्चर्स च्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी शिकू शकता. इथे आपल्याला अनुभवी शिक्षक शिकवून आपला सराव करून घेतात.

आणि काही आठवड्यात आपण आपलं इंग्रजी सुधारत असल्याचं अनुभवू शकता. आणि जेव्हा कोर्स पूर्ण होतो तेव्हा आपण एक अस्खलित इंग्रजी बोलणारी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असलेली व्यक्ती बनता. सोबत आपलं व्यक्तिमत्व सुधारलं असल्याचं लोकच आपल्याला भेटून पुन्हापुन्हा सांगतील.

इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ह्यालाच म्हणतात.


137 views0 comments
bottom of page